11-ONLINE-ADMISSION
अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक जाहीर
विद्यर्थी मित्रांनो CBSC व ICSE परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत.लवकरच राज्य शिक्षण मंडळाकडून निकाल लावला जाण्याची शक्यता आहे . अकरावी ला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनाआनंदाची बातमी आहे .
केंद्रीय शिक्षण मंडळाकडून अकरावी कनिष्ठ महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया जाहीर करण्यात आली ; असून त्यानुसार मुंबई महानगर क्षेत्र , पुणे- पिंपरी-चिंचवड ,अमरावती ,नाशिक ,नागपूर ,औरंगाबाद महानगरपालीका क्षेत्रातील कनिष्ट महाविद्यालयातील अकराविच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यानुसार २५ मी पासून ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेचा पहिला भाग भारत येणार आहे. राज्याचा दहावीचा निकाल आजून लागला नाही त्यामुळे निकाल लागल्यानंतर दहा ते पंधरा दिवसांनी पहीली फेरी लागणार आहे . ऑगस्टच्या अखेरपर्यंत सगळी प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे .
CBSC व ICSE दहावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत . लवकरच राज्य शिक्षण मंडळ निकाल लावेल अशी अपेक्षा आहे . त्यामुळे शैक्षणिकवर्ष २०२३-२४ साठी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे नियोजन करणे चालू झाले आहे.
त्यासाठी माध्यमिक शिक्षण संचालकाकडून विभागीय शिक्षण उपसंचालकांना खालीलप्रमाणे सूचना करण्यात आल्या आहेत .
1.प्रवेश प्रक्रियेबद्दल विद्यर्थी आणि पालकांना माहिती देणे.
2. प्रवेश प्रक्रियेबद्दल विद्यर्थी आणि पालकांना मार्गदर्शन कसे मिळेल याचे नियोजन व कृतिआराखडा तयार करणे.
3.विध्यार्थी व पालकांसाठी उद्बोधन वर्ग व कार्यशाळा आयोजन करून ,
4.मार्गदर्शन केंद्रासाठी प्रशिक्षण आयोजित करणेबाबत.
- केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकानुसार अशी असेल ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया.
१. २० ते २४ मे या दरम्यान विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज नोंदनी ,प्रवेश अर्ज भरण्यासाठी सरावाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे .
२. २५ मे पासून ऑनलाईन नोंदणी प्रवेश अर्जाचा भाग एक भरणे .
३. भाग एक भरल्यावर तो प्रमाणित केला जाईल याची नोंद घ्यावी.
४. दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावी प्रवेश अर्जाचा भाग दोन विद्यार्थ्यांना भरता येईल.
५ . २० मे पासून शाळा व कनिष्ट महाविद्यालयांची नोंदणी दहावीचा निकाल जाहीर होईपर्यंत चालू राहील.
६. अल्पसंख्यांक व्यवस्थापन व राखीव जागा व्यवस्थापन प्रवेश प्रक्रिया दहावीच्या निकालानंतर स्पष्ट करण्यात येईल .
अधिक माहितीसाठी या ठिकाणी क्लीक करा.
प्रवेश फेऱ्या बद्दल...
1. ११ वि ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत तीन नियमित आणि दोन विशेष फेऱ्या होतील .
2. उर्वरित विद्यारर्थ्यांसाठी दैनंदिन गुणवत्ता विशेष फेऱ्या होतील .
3. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य फेरी होणार नाही .
- ऑगस्टच्या अखेरपर्यंत सगळी प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे .
माहिती आवडल्यास नक्की शेअर करा, लाईक करा.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा