गुलमोहराविषयी थोडक्यात माहिती ......GULMOHAR-JWALA-ज्वाला -BHADAK-भडक-मोलश्री-ब्लॅकबोर्ड ट्री-मेडलर-बुलेट वुड ट्री
गुलमोहर मे महिना नुकताच चालू झालेला होता पावसाळ्यात हिरवागार असणारा गुलमोहर आता पाने गाळायला लागला होता . हिवेगार असणारे रूप आता वृध्दापकाळाने वाटलेल्या झाडासारखा दिसत होते . पानांचा पडलेला सडा आता येणारा - जाणारा तुडवून तसाच पुढे जात होता . पण कुणालाही त्याच्या नवजीवनाचा हाच तर उगम आहे याची तीळ मात्र कल्पना नव्हती . त्याच्या जववाळून गेलेली रेल्वेची पटरी तिला मात्र याची कल्पना होती कि इतकेदिवस सावली देणारा गुलालमोहर आता का नाराज झाला असेल. आज तिला पण उन्हाचे चटके सहन करावे लागत होते ,आजपर्यंत तीला उन्हाची कधी जाणीव झाली नव्हती पण आज मे चे ऊन ते तिला जाणवून देत होते . पण तीला काय माहित कि आज तो कीती खुश आहे कारण त्याचा आवडीचा वसंत ऋतू नवजीवन घेऊन आला होता . तो मात्र मनोमन आनंदित होता आणि पाटरीच्या त्या विचारा वर हसत होता . ...