२०००-हजार-रुपयाची-नोट-बंद-2000-RUPAYE-NOTE-BAND

2000 RUPAYE NOTE BAND

रु २००० हजार रुपयाची नोट बंद घाबरून जाऊ नका ,हे काम करा .... 

2000 RUPAYE NOTE BAND
2000 RUPAYE NOTE BAND

  • २००० रु नोटेचा  इतिहास :

                    2000 RUPAYE NOTE BAND रु २००० किमतीची नोट नोव्हेंबर २०१६ मध्ये आर बी आय कायदा १९३५ च्या कलम (२४)१ ने चलनात आणल्या होत्या. प्रामुख्याने त्यावेळी रु ५०० आणि रु १००० च्या व्यवहारात असणाऱ्या नोटांचा कायदेशीर दर्जा काढून घेतल्यमुळे , अर्थव्यवस्थेमध्ये चलनाची पोकळी भरून काढण्याच्या उद्धेशाने या नोटा चलनात आणण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 

                      बाजारामध्ये इतर किमतीच्या नोटा पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाल्यावर रु  २००० च्या  नोटा छापण्याचा उद्धेश पूर्ण झाला ; त्यामुळे वर्ष २०१८-२०१९ मध्ये या नोटा छापणे बंद करण्यात आल्या .

 2000 RUPAYE NOTE BAND

  • नोटांची सध्यस्थिती :

                        सध्या व्यवहारात  रु २०००  किमतीच्या , ३१ मार्च २०१७ च्या पूर्वी छापलेल्या  ८९%  नोटा ज्या कि अंदाजे ४-५ वर्ष चाललय त्या शेवटच्या टप्प्यात आहेत. ३१ मार्च २०१८ ला या नोटांची जास्तीत जास्त संख्या रु ६.७३ करोड रु (व्यवहारातील नोटांच्या  ३७.३ % )होत्या ज्या २०२३ ला कमी करून रु ३.६२ लाख करोड रु  (व्यवहारातील नोटांच्या १०. ८ % )झाली  आहे .


  • नोटा बंद करण्याचे कारण:

  1. सरकारच्या निदर्शनास  असे आले आहे कि २००० रु च्या नोटा सामान्यपणे व्यवहारात येत नाहीत. या व्यतिरिक्त अर्थव्यवस्थेची  गरज भागवण्या इतपत बाजारात इतर किमतीच्या नोटा योग्य प्रमाणात उपलब्ध आहेत. 
  2. वरील कारणांमुळे तसेच भारतीय रिजर्व बँकेच्या 'स्वच्छ मुद्रा नीती ' हे धोरण लक्षात घेऊन बाजारातील २००० रु किमतीच्या बँक नोटा परत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

  • कशी असेल प्रक्रिया :

  • रु २००० मूल्याच्या बँक नोटा कायदेशीर चलन राहील. 
  • भारतीय रिजर्व बँकेने याआधीपण सन २०१३-१४ ला व्यवहारातील नोटा हटवण्याचे काम केल्याचा उल्लेख आहे.

  • त्यानुसार जनता रु २००० किंमतीच्या नोटा स्वतःच्या बँक 2000 RUPAYE NOTE BANDखात्यात जमा करू शकतात अथवा त्या बदल्यात इतर किमतीच्या नोटा कोणत्याही बँकेच्या शाखेतून बदलून घेऊ शकतात.

  • बँकेत पैसे भरण्याची प्रक्रिया सामान्यपणे पाहिल्यासारखीच ,म्हणजेच कोणत्याही प्रकारचा विरोध न करता वर्तमान आदेशानुसार व कायदेशीर बाबींची पूर्तता करून होईल. बँकेच्या दैनंदिन कामामध्ये अडथळा न आणता कार्यात्मक सुविधा निश्चित करण्याच्या दृष्टीने एका वेळेस रु २००० किमतीच्या रु २०००० रक्कम २३ मे  २०२३ पासून कोणत्याही बँकेच्या शाखेतून इतर किमतीच्या नोटा बदलून घेऊ शकता. 
  • या कार्याला निश्चित वेळेत पूर्ण करण्यासाठी व जनतेला रु २००० किमतीच्या नोटा जमा करणे /बदलने यासाठी  पुरेसा कालावधी देण्याच्या उद्धेशाने रु २००० किमतीच्या नोटा  जमा करणे /बदलने हि सुविधा दिनांक ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत बँकेकडून पुरवण्यात येईल. बँकेला या बाबतीत विशेष दिशानिर्देश देण्यात आले आहेत. "2000 RUPAYE NOTE BAND"
  • रु २००० किमतीच्या बँक  नोटा एका वेळेस रु २०००० पर्यंतची रक्कम रिजर्व बँकेच्या १९ विभागीय कार्यालयात बदलून देण्याची सुविधा २३ मे २०२३ पासून उपलब्ध असेल. 

  • बँकांना सूचना:-

  1. भारतीय रिजर्व बँकेने सर्व बँकांना सूचना केल्या आहेत कि रु २००० किमतीच्या नोटा तात्काळ प्रभावाने देणे बंद करावे.
  2. जनतेला आवाहन करण्यात येत आहे कि दिनांक ३० सप्टेंबर या कालावधीपर्यंत रु २००० किमतीच्या नोटा जमा करव्या  किंवा बदलून घ्याव्यात. 
👉नागरिकांनी कोणत्याहीप्रकारच्या अफवांना बाली पडू नये. २००० रु च्या नोटेची कायदेशीर किंमत अजुनही बाजारात तीच आहे . 

👉अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.....

  • माहिती आवडल्यास नक्की शेअर करा लाईक करा

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

महाराष्ट्र-राज्य-अनुसूचित-जाती-जमाती-आयोग-Maharashtra-State-Scheduled-Castes-Tribes-Commission

पनीर कसे बनवावे. पनीर खाण्याचे फायदे. पनीरमधील महत्त्वाचे पोषक घटक.PANEER KASE BANVAVE-PANEER BENIFITS-IMPORTANT-NUTRIENTS-IN-PANEER

मेथीची भाजी /METHICHI BHAJI/METHICHI BHAJI IN MARATHI/METHICHI BHAJI RECIPES