LABHARTHI-PORTAL-लाभार्थी पोर्टल-shasan-aaplya-dari
LABHARTHI PORTAL लाभार्थी पोर्टल मित्रांनो शासन आपल्यादारी या योजनेअंतर्गत राज्य सरकार अनेक योजना राबवत आहे. त्यामध्ये राज्य व केंद्र सरकारच्या योजनांचा समावेश आहे या योजना व्यापक स्वरूपात प्रसार व प्रचार करण्यासाठी आता लाभार्थी या पोर्टलची निवड करण्यात आली आहे. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांपैकि तुम्ही कोणत्या योजनांना पात्र होऊ शकता हे समजनू घेण्यासाठी ‘लाभार्थी ’ हे वेबपोर्टल मदत करते. LABHARTHI PORTAL लाभार्थी पोर्टल LABHARTHI PORTAL लाभार्थी पोर्टल लाभार्थी पोर्टलचा उद्देश : सरकार नागरिकांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवते. परंतु त्या योजनांबद्दल, त्यांच्यासाठी पात्रतेचे निकष आणि त्यासाठी कुठे आणि कसा अर्ज करायचा याविषयी अनभिज्ञतेमुळे लाभार्थी अशा योजनांपासून वंचित राहू शकतात. अशा सर्व योजनांची अचूक माहिती संकलित करणे आणि त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे नागरिकांना लागू योजनांची सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध करून देणे हे 'लाभार्थी'चे मुख्य उद्दिष्ट आहे. विविध सरकारी योजना, नागरिकांच्या माहितीचे असंख्य स्रोत आणि विविध केंद्र आणि राज्य तसेच जिल्हास्तरीय सरकारी निर्...