थायरॉईड(THYROID) म्हणजे नेमके काय ? थायरॉईड उपाचार,थायरॉइडमुळे होणारे आजार,थायरॉईडची लक्षणे,थायरॉईडबद्दल संपूर्ण माहिती.

THYROID

मित्रांनो आपण आज थायरॉईड या आजाराविषयी थायरॉईड(THYROID) म्हणजे नेमके काय ? थायरॉईड उपाचार,थायरॉइडमुळे होणारे आजार,थायरॉईडबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. 

 
थायरॉईड(THYROID) म्हणजे नेमके काय ? थायरॉईड उपाचार,थायरॉइडमुळे होणारे आजार,थायरॉईडची लक्षणे,थायरॉईडबद्दल संपूर्ण माहिती.
THYROID

  • थायरॉईड (THYROID)काय आहे ?

               थायरॉईड हि शरीराची एंडोक्राइन ग्रंथी आहे जी कि फुलपाखराच्या आकारचीअसते आणि ती गळ्याच्या जवळ असते. या ग्रंथीमध्ये थायरॉईड नावाच्या हार्मोन्सचा स्राव होतो. आपल्या शरीरात हे हार्मोन्स चयापचयाची गती नियंत्रित करण्याचे काम करतात. थायरॉईड ग्रंथी शरीरात आयोडीन बनवण्याचे काम करते. याग्रंथीतून स्रवणारे हार्मोन्स चयापचय क्रिया संतुलीत ठेवण्यासाठी खूप मदत करते. थायरॉईस होण्यामागचे कारण म्हणजे थायरॉईड हार्मोन्स असंतुलित होणे. त्यामुळे आपल्या शरीराची सम्पूर्ण कार्यप्रणाली बिघडून जाते. त्यामध्ये अव्यवस्थितपणा  येतो. 'THYROID'

थायरॉईड दोन प्रकारचाअसतो. 

१. हायपोथायरॉईड :

यामध्ये थायरॉईड ग्रंथीची सक्रियता कमी होऊन उद्भवलेली स्थिती . त्यामुअळे शरीरात आवश्यक तेव्हडे टी. थ्री टि फोर हार्मोन्स शरीरात पोहचत नाहीत.

 हायपोथायरॉईड लक्षणे :

या परिस्थितीत वजन अचानक वाढायला लागते. शरीर स्थूल होते. आणि जड झाल्यासारखे वाटते. दररोजच्या कामात किंवा हालचालीत आवड कमी होते. काही वेळा पायाला सूज येने पायाला आखडल्यासारखे वाटते. चालायला तकलिफ होते. थंडी जास्त जाणवते. कब्ज झाल्यासारखे वाटते.चेहरा आणि डोळे सुजतात.मासिकपाळी अनियमित येते. त्वचा कोरडी पडते आणि केस गळती होते . ती व्यक्ती नेहमी डीप्रेशनमध्ये राहते. ताणतणावात राहते बोलता बोलता  ती व्यक्ती भावुक होऊन जाते. आवाज कोरडा आणि जड झाल्यासारखा वाटतो. हा आजार ३० ते ६० यावयातील स्त्रीयांमध्ये जास्त जाणवतो.आता दुसरा प्रकार पाहू. 

हायपरथायरॉईड :

"या प्रकारामध्ये थायरॉईड ग्रंथी जास्त सक्रिय होऊन होते.जास्त सक्रिय झाल्यमुअळे टि. थ्री. व टी.फोर. नावाचे हार्मोन्स तयार होऊन रक्तात मिसळतात."

हायपरथायरॉईड लक्षणे:  

  • या प्रकारात वजन अचानक कमी व्हायला लागते.
  • भक जास्त लागते ,
  • रोग्याला गर्मी अजिबात सहन होत नाही ,
  • खूप जास्त प्रमाणात घाम येतो ,
  • छातीची धडधड वाढते. ,
  • झोप लागत नाही. 
  • हात थरथर कपाटात. 
  • डोळयांची झोप जात नाही . 
  • मासिक पाळीत जास्त रक्त जाते. 
  • बऱ्याच वेळा गर्भपात पण होतो. 
  • हाइपरथायरॉईड  हा जास्त करून २० वर्ष वय असणाऱ्या महिलांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो.  
  • थायरॉईड ह्या आजाराचे प्रमाण स्त्री मध्ये जास्त आहे.
  • त्यामध्ये प्रमुख म्हणजे जाडी वाढणे होय. 
  • साधारण १० स्रियांपैकी ८ महिलांची जाडी वाढलेली जाणवते . 
  • यामुळे ताणतणाव वाढतो.
  • झोप चांगली लागत नाही. 
  • कोलेस्ट्रॉल वाढणे ऑस्टिओपोरोसिस.
  • वांझपणा पण येतो. 
  • मासीक पाली वेळवर न येणे.
  • हृदयाची धडाधड वाढणे.

अशा अनेक समस्या येतात.  

थायरॉईड तपासणी. "THYROID"

थायरॉईडच्या(THYROID) दोन्ही प्रकारात आपल्याला ररक्ताची तपासणी करावी लागते.रक्त तपासणी मध्ये टी. थ्री.टी.फोर.  आणि टी. एस. एच.पातळी या तपासून हार्मोन्स ची सक्रिय पातळी समजून घेता येते तपासणी केल्यावर रिपोर्ट नुसार डॉक्टर उपचार करत असतात बऱ्याचं वेळी रोग्याला जन्मभर औषधे खावी लागतात परंतु प्राथमिक स्वरूपाच्या पायरीला योग्य औषध उपचार लकरून पण लवकर बारा करता येतो. बऱ्याच गोष्टी खाणे टाळले तर आपण तो कंट्रोल मध्ये ठेऊ शकतो ज्यामुळे तो वाढतो अशा बाबी टाळाव्या लागतात.

थायरॉईड(THYROID) म्हणजे नेमके काय ? थायरॉईड उपाचार,थायरॉइडमुळे होणारे आजार,थायरॉईडची लक्षणे,थायरॉईडबद्दल संपूर्ण माहिती.
THYROID


थायरॉईड (THYROID)ऊपचार. 
 

1.रेडिओऍक्टिव आयोडीन ट्रीटमेंट :

किरणोत्सर्गी आयोडीन उपचार हा अंतर्गत रेडिओथेरपीचा एक प्रकार आहे. हे आयोडीन 131 (I-131) नावाचे आयोडीनचे किरणोत्सर्गी स्वरूप वापरते. थायरॉईड कर्करोगावर हा एक उपयुक्त उपचार आहे कारण थायरॉईड  THYROID ग्रंथी तुमच्या शरीरातील बहुतेक आयोडीन शोषून घेते आणि साठवते. थायरॉईड ग्रंथीला विशिष्ट पदार्थांमधून आयोडीन मिळते आणि ते आवश्यक थायरॉईड संप्रेरक तयार करण्यासाठी वापरते.
किरणोत्सर्गी आयोडीन एक लक्ष्यित उपचार आहे. किरणोत्सर्गी आयोडीन तुमच्या रक्तप्रवाहात तुमच्या संपूर्ण शरीरात फिरते. परंतु ते प्रामुख्याने थायरॉईड पेशींद्वारे घेतले जाते, इतर पेशींवर त्याचा फारसा परिणाम होत नाही. तुमच्या शरीरातील थायरॉईड कर्करोगाच्या पेशी आयोडीन घेतात. आयोडीनमधील रेडिएशन नंतर कर्करोगाच्या पेशी नष्ट करते.
हे फक्त काही प्रकारच्या थायरॉईड कर्करोगासाठी योग्य आहे. हे यासाठी एक उपचार आहे:

प्राणायाम

2.उज्जयिनी प्राणायाम

थायरॉईडला आपण योगासने आणि प्राणायाम करून कमी करू शकतो उज्जयिनी प्राणायाम दिवसातून एकदा तरी करायला हवा नियमित पाने केल्याने  अनेक अद्भुत लाभ झाल्याची उदाहरणे आहेत. काही रोग्यांचा तर  पूर्णनपणे बारा झालेला आहे त्यामुळेउज्जयिनी प्राणायाम तुमच्या जीवनाचा एक भाग बणचुण नियमित पाने केल्यास अद्भुत लाभ होतील . 

3.कपालभाती प्राणायाम

नियमितपणे कपालभाती या प्राणायामाचा अभ्यास केला तर उत्तमच यामुळे गळ्याचा चांगला व्यायाम होतो. दररोज कमीतकमी १५-२० मिनिट याचा अभ्यास करायला हवा 

4.योगासन 

योगासनांमध्ये तुम्ही खलील योगासने करू शकता. 

  • हलासन 
  • सेतुबंधासन 
  • सर्वांगासन 
  • भुजंगासन
  • उष्ट्रासन
  • कटिबंधासन 

सगळी आसने २-३ वेळा आवश्य करावी. योगासनांना तुमच्या जीवनाचा भाग बनवा आणि नियमितपणे योगासने करावी त्यामुळे तुमचे वजन वाढणार नाही,थायरॉईड ग्रंथी सक्रिय होण्यास मदत होते आणि शरीराची चयापचय क्रिया योग्य काम करायला लागते.  

5.ऍक्युप्रेशर चिकित्सा

ऍक्युप्रेशर चिकित्सा योग्य सल्ला घेऊन तुम्ही त्यावर उपाय करू शकता. 

6.दुधी भोपळा 

थायरॉईडची THYROID समस्या दूर करण्यासाठी आपण आपल्याला आहारामध्ये दुधी भोपळ्याचा रस देखील घेऊ शकता मात्र थायरॉईडची समस्या दूर करायची असेल तर आपण दुधी भोपळ्याचा रस दररोज सकाळी उपाशी पोटी घेतला पाहिजे ज्यामुळे आरोग्याच्या समस्या दूर होण्यास मदत होते दूध दुधी भोपळ्याच्या रसामुळे शरीराला सर्व पोषक तत्व मिळतात थायरॉईड नियंत्रणात राहते आणि अतिरिक्त वजन कमी होते. 

6.अश्वगंधा पावडर 

अश्वगंधा पावडर रोज कोमट पाण्यात कोमट किंवा गाईच्या दुधासोबत घेतल्याने थायरॉईडची समस्या दूर होते.  शरीरातील हार्मोन्स संतुलन दूर करण्यासाठी हे खूप फायदेशीर मानले जाते. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्याची पाने किंवा मुळे पाण्यात उकळूनही घेऊ शकता त्यामुळे थायरॉईडची समस्या दूर होण्यास मदत होते तसेच आपण अश्वगंधा पावडरचे देखील सरळ सेवन करू शकतो. 

प्रामुख्याने या चार बाबी टाळायला पाहॆजेत.  

  • आयोडीन युक्त जेवण .

कारण आयोडीनयुक्त आहार घेतल्यास थायरॉईड ग्रंथी शरीरातील आयोडीन जास्त घेते आणि थायरॉईड हार्मोन्स ची नियमिती जास्त तयार करते. त्यामुअळे हायपोथायरॉईड प्रकारात जास्त आयोडीन युक्त पदार्थ खाणे टाळावे.सी फूड आणि जास्त मीठ असणारे पदार्थ टाळावे. 

  • कैफिन. 

कैफिन युक्त पदार्थ खाणे टाळावे ,कैफिनमुळे प्रत्यक्ष कोणती ही हाणी नाही परंतु थायरॉईड मुळे होणारे आजार जसे कि छातीत धडधड होणे ,झोप न लागणे इ. वाढण्यास मदत करते.  

  • रेड मीट 

रेड मीट मध्ये कोलेस्ट्रॉल आणि सॅच्युरेडेट फॅट जास्त प्रमाणात असते . त्यामुळे वजन लवकर वाढते .नाहीतरी थायरॉईड असणाऱ्या व्यक्तीचे वजन जास्त लवकर वाढत असते.  म्हणून रेड मीट खाणे टाळावे.रेड मीट खाल्ले असता थायरॉईड असणाऱ्या व्यक्तीच्या अंगाची आग होते अशा बऱ्याच तक्रारी आल्या आहेत.  

  •  अल्कोहोल 

अल्कोहोल म्हणजेच दारू बियर इ. यामुळे शरीराची एनर्जी लेव्हल प्रभावित होते. थायरॉईड असणाऱ्या लोकांनां झोपेची समस्या असते ती दारूमुळे अजून वाढण्याची शक्यता असते. याच्यातिरिक्त अलकोहोलमुळे ऑस्टोपोरोसिसचा धोका पण वाढला जातो.  

  • वनस्पती तूप 

वनस्पती तूप बनवताना हॉड्रोजनची प्रक्रिया केली जाते . हायड्रोजन शरीरातील चांगले कोलेस्ट्रॉल कमी करते आणि खराब कोलेस्ट्रॉल वाढवण्याचे  काम करते . वाढलेल्या थायरॉइडमुळे जी समस्या तयार झाली त्याला हे अजून वाढण्यास मदत करते या साऱ्या बाबी टाळाव्यात. रसत्यावरचे पदार्थ खाणे टाळावे त्या मध्ये जास्तप्रमाणात वनस्पतीची तूप वापरतात . 

  • मासे 

हापोथायरॉईड या प्रकारात थायरॉईड ग्रंथी आयोडीन कमी  प्रमाणात निर्मण करते म्हणून या प्रकारात मासे खाल्ले तरी चालतात; परंतु हौपरथायरॉईड प्रकारात मात्र मासे खाऊच नयेत. समुद्री माशांमध्ये ओमेगा ३ फॅटी ऍसिड भरपूर प्रमाणात असते ते शरीराला चांगले असते.

याव्यतिरिक्त खाली दिलेल्या गोष्टी करायला हव्यात .साधारणपणे याआजाराने जवळपास १०० पैकी ७० महिलांना हा आजार असल्याचे एका सर्व्हे नुसार निदर्शनास आले आहे. त्यामुळे महिलांची नियमित पने रक्ताची तपासणी वर्षातून एकदा तरी करायला हवीच. 

थायरॉईड कंट्रोल करण्यासाठी महत्त्वाचा आहार 

  • विटामिन डी आणि यासारख्या आजारा पासून बचाव करतो.
  • सकाळी लवकर उठून सूर्य किरणांमधून विटामिन डी घेण्याचा प्रयत्न करा. 
  • विटामिन ई सुद्धा फायदेशीर ठरतो त्यासाठी तुम्ही गाजर अंडी आणि हिरव्या पालेभाज्यांचे सेवन करा.
  • थायरॉईडची समस्या असल्यावर जास्तीत जास्त फळे आणि हिरव्या भाज्यांचे सेवन केलं पाहिजे.
  • वजन कोलेस्ट्रॉल आणि डायबिटीस नियंत्रनात  ठेवण्यासाठी योग्य आहार सेवन करायला हवा. 
  • त्यासाठी कॅल्शियम,विटामिन आणि प्रोटीन असलेला आहार थायरॉईड ग्रस्त लोकांसाठी महत्त्वाचा आहे दूध आणि दह्याचा अधिक सेवन करावं.
  • आवश्यक तेव्हडी पुरेपूर झोप घ्यावी. 
  • टी.व्ही.पाहत जेवण करू नये मोबाईलचा वापर कमी प्रमाणात करावा मोबाईल एक मोठी समस्या बनली आहे.

माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा... 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

महाराष्ट्र-राज्य-अनुसूचित-जाती-जमाती-आयोग-Maharashtra-State-Scheduled-Castes-Tribes-Commission

पनीर कसे बनवावे. पनीर खाण्याचे फायदे. पनीरमधील महत्त्वाचे पोषक घटक.PANEER KASE BANVAVE-PANEER BENIFITS-IMPORTANT-NUTRIENTS-IN-PANEER

मेथीची भाजी /METHICHI BHAJI/METHICHI BHAJI IN MARATHI/METHICHI BHAJI RECIPES