शेतीची मशागत आणि पेरणी !SHETI-MASHAGAT-KUALVANI
मशागतीपूर्वची तयारी शेतीची मशागत करताना प्रथमतः आपल्याला जमिनीमध्ये असणारे काटे कुठे आणि पालापाचोळा यांची योग्य ती विल्हेवाट लावली पाहिजे बांधावर असणाऱ्या काटेरी झुडपे, गवत यापासून स्वच्छ करून घेणे गरजेचे असते.शेतीची तयारी कार्य करत असताना आपण खलील बाबींचा विचार प्रामुख्याने करतो.
1.जमीनीचे सपाटीकरण.
त्यानंतर बारीक विचार केला तर जमिनीची असणारी लेवल एकसारखी आहे की नाही यावरून आपण योग्य ती समतोल पातळी करून घ्यावी त्याचबरोबर आपल्याला पाऊस पडल्यानंतर येणाऱ्या पाण्याचा प्रवाह योग्य दिशेने काढून देण्याची गरज असते या सर्व गोष्टीचा विचार करून जमिनीच्या मशागतीच्या तयारीला लागावे लागते. एकंदरीत जमिनीच्या साफसफाई चे काम झाल्यावर आपल्याला मशागतीची गतीची तयारी करावी लागते.जमिनीची मशागत करताना आपल्याला खलील बाबींची काळजी घ्यावि लागते .
2. बांध-बंदिस्त करणे.
बऱ्याच ठिकाणी डोंगराळ भाग असतो त्यामुळे जमिनीची असणारी खाली वर पातळी सपाट करून घ्यावी लागते नाहीतर पनी बसत नाही आणि एकच बाजूंला नाला पडून जमिनीची धूप होण्याची शक्यता असते .मराठवाडा भाग हा जेमतेम डोंगराळ आहे त्या ठीकानी या बाबी प्रकाशने जाणवतात.बऱ्याच ठिकाणी आपल्याला जमिनी छोट्या तुकाड्यामध्ये विभागलेली दिसते त्यासाठी आपण बांधबंदिस्ती करतो कारण जमिनीची समतल पातळी नसते .पाऊस कमी अधिक झालाच तर बांध फुटतात आणि शेतात मधूनच पाणी वाहून नाला तयार होतो त्यासाठीआपल्याला बांधाच्या बाजूने नाला काढावा लागतो जेनेकरून शेजाऱ्याला पण त्याचा त्रास होणार नाही ह्या साऱ्या गोष्टी आपल्याला प्रामुख्याने कराव्या लागतात.
3.झाडांची छाटणी करणे.
बांधावर असणारी मोठ्या झाडांच्या फांद्या छाटणी कराव्या लागतात नाहीतर त्यामुळे ओसावा पडून झाडाच्या सभोवताली पीक येत नाही त्यासाठी आत्ताच आपाल्याला झाडाची छाटणी करावी लागते. त्यां मधून आपल्याला योग्य त्या प्रमाणात झाडाची उंची पण वाढवता येते.झाडांचे संवरक्षण करायला हवे तरच आण निरोगी जीवन जगू शकतो.
4. नांगरणी करणे.
शेती मशागतिमध्ये महत्वाचा भाग म्हणजे नांगरणी
नांगरणी करताना आपल्याला विशेष काळजी घ्यावी लागते करण जमिनीचा आसनारा चढ -उतार पावसाची क्षमता , आपण घेणारे पीक या सर्व बाबींचा विचार करावा लागतो त्यासाठी आपण नियोजण करणे गरजेचे ठरते .बऱ्याच वेळा खोल नांगरट झाली तर बी खोलवर पडले तर उगवण्याची शक्यता कमी असते. त्यामध्ये तूर सारखे धान्य उगवते पण बाजरी उगवू शकत नाही.भारतामध्ये हंगामानुसार पिके घेतली जातात त्यामुळे आपण कोणत्या हंगामात पीक घेणार आहोत तशी काळजी घ्यायला हवी.ही झाली नांगरट या बाबतीत ली काळजी
5. कुळवणे.
आता आपण बघू कुळवणी कशी करावी काशी नाही. कुळवनि करताना आपल्याला पावसा अगोदार आणि पाऊस पडल्यानंतर करावी लागते.जमिन भुसभुशीत असेल तर एकवेळ कुळवनि करून पण चालते पण नसेल तर मोठाली ढेकळे फोडण्यासाठी आपल्याला पाऊस पडला की मग कुळवणी केली तरी चालते कारण पावसाने माती विरघळते आणि आपोआप बारीक होते
6. शेणखत घालणे.
शेतीचा पोत सुधारण्यासाठी शेणखत घालणे गरजेचे असते त्यासाठी नांगरट झाली की लगेच खत घालून घेतले की ते कुळवतांना मातीमघ्ये पूर्णपणे मिसळते.
7.खत आणि बी-बियाणे
खतांचा विचार केला तर आजकाल तुटवडा भासतो म्हणून आपल्याला अगोदरच त्याची काळजी घ्यायला हवी नाहीतर ऐनवेळेस तारांबळ होते.खतांची निवड करताना आपली जमीन आणि तिचा पोत यावरून करावा.ISI दर्जाची खते किंवा सरकारी मान्यता असलेली च खरेदी करावी आजकाल प्रधानमंत्री किसान केंद्र चांगाली खते पुरवत आहेत.त्या केंद्रातूनच खतांची खरेदी करावी .
-- बी-बियाणे --
बियाणे खरेदी करताना पण विशेष काळजी घ्यावी लागते करण आजकाल बाजारात खूप मोठ्या प्रमाणात फसव्या जाहिराती करून बोगस बियाणे विकली जातात.बीटी कॉटन या कापसाच्या प्रजातीचा खूप बोगस प्रसार मागील काही वर्षात आपण बघितला असेलच म्हणून खरदारीचा उपाय म्हणून योग्य त्या अधिकृत बियाणे विक्रेत्याकडूनच खरेदी करावी.
7.कीटकनाशके.
आजकाल जर बघितले तर खूप सारी केमिकल युक्त औषधे बाजारात उपलब्ध आहेत पेरणी करताना पण आपल्याला बीजप्रक्रिया करण्यासाठी औषधी लागतात;परंतु घरगुती पद्धतीने शेती करत असताना पारंपरिक पद्धतीने करणे खूपच भारी आहे त्यामुळले खर्च पण कमी होतो आणि उत्पादन क्षमता पण वाढते बीजांची.
8.बुरशीनाशके.
बियांची पिणी केली असता काही वेळेला बीज जमिनीत असताना त्याला बुरशी लगन्याची शक्यता असते. पाऊस कमी जास्त झाला तर अशी परिस्थिती उद्भवते म्हणून बीज प्रक्रिया करताना हमखास गोमूत्र, BAC पावडर किंवा लिंबोली अर्क जरूर लावावा म्हणजे बीज खराब होणार नाही.
आशा प्रकारे आपण शेतीची मशागत आणि पेरणी बद्दल माहिती बघितली माहिती आवडली तर नक्की शेअर करा.



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा