Z-P-BHARATI-NAVIN-G-R-जिल्हा-परिषद-भरती-प्रक्रिया-नवीन-जि.-आर.

    जिल्हा परिषद भरती नवीन G. R.मधील महत्वाचे बदल.


                जिल्हा परिषद भरती प्रक्रिया नवीन जि. आर. नुसार काही बदल करूंन भरती प्रक्रिया लवकरच चालू होईल .या जी आर नुसार नवीन बदल करण्यात आले असून त्याबद्दल महत्वाची माहिती आपण पाहणार आहोत  शासनाच्या निर्णयानुसार जिल्हा परिषद अंतर्गत गट-क मधील सर्व संवर्गातील ( वाहनचालक  व गट - ड संवर्गातील  पदे  वगळून )सरळ सेवेची रिक्त पदे भरण्याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमीत करण्यात आलेल्या आहेत .

                               त्या अनुशंगाने संदर्भ क्रमांक . २ व ३ नुसार सरळ सेवेची रिक्त पदे भरणे बाबत वेवेळापत्रक निश्चित करण्यात आले होते . ततसेच सामान्य प्रशासन विभागकडील शासन निर्णय दि . २ नोव्हेम्बर २०२२ अन्वये भूतपूर्व सेवा निवड मांडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील )गट -ब (अराजपत्रीत )व गट - क व गट -ड संवर्गातील नामनिर्देशनाच्या  कोट्यातील पदे (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हीसेस  लिमिटेड) व  आय.बी.पी.एस. (इंस्टीटयूट ऑफ बॅंकिंग  पसोनेल सिलेक्षण ) या कंपनीमार्फत राबविण्याच्या  सूचना निर्गमित करण्यात  आल्या आहेत. त्यामळे सरळ सेवेची रिक्त  पदे वरील कंपनीमार्फत भरण्यासाठी  जिल्हा परिषदांमध्ये एकसूत्रता असने आवश्यक आहे.त्यासाठी शासनाने नवीन जी आर काढला आहे .   

1. भरती प्रक्रयेसाठी विचारत घ्यावयाचे वय ,शैक्षणिक अहर्ता व वय विचारात घ्यावयाचा दिनांक . 

महत्वाचा बदल पुढीलप्रमाणे :

                 शासनाचे विविध विभागाकडून वेळोवेळी निर्गमित करणेत आलेले शासन निर्णय, अधिसूचना, परिपत्रक इत्यादींद्वारे निश्चित केलेली वयोमर्यादा व शैक्षणिक अहर्ता नमूद केलेली आहे 

            त्याचबरोबर साध्यस्थितीतील असलेली वयोमर्यादा दिनांक ०३ मार्च २०२३ चे शासन निर्णयानुसार

 दिणांक ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत कमल वयोमर्यादेत (खुल्याप्रवर्गासाठी ३८ वर्षे व मागास प्रवर्गासाठी  ४३

 वर्षे ) दोन वर्षे इतकी शिथिलता(खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्षे व मागास प्रवर्गासाठी ४५ वर्षे )विचारात

 घेण्यात यावी. तसेच विहित केलेल्या कमाल वयोमर्यादेपेक्षा विहित केली आहे आशा पदांसाठी देखील

 दिनांक ३१ डिसेंबर २०२३  पर्यंत विहित कमाल वयोमर्यादेत  वर्षे इतकी शिथिलता देय राहील. 









               त्याच बरोबर ग्रामविकास विभाग, शासन निर्णय दिनांक 21ऑक्टोबर,2022 नुसार मार्च 2019 च्या जाहिराती प्रमाणे अर्ज केलेले आहेत/भरलेले आहेत ,आशा उमेदवारांचे वयाधिक्य झाले असल्याने ते परीक्षेस बसण्यास अपात्र होऊन त्यांचे नुकसान होऊ नये याकरिता सन 2023 मध्ये प्रसिध्द होणाऱ्या सरळसेवा भरती प्रक्रियेच्या जाहिरातीमध्ये त्यांना वयोमर्यादेत सूट देण्याबाबतची दक्षता घ्यावी.

तसेच भरयी प्रक्रियेसाठी उमेदवारांचे वय निश्चित करण्यासाठी दि.1जून 2023 हा दिनांक निश्चित करण्यात येत आहे.

                  अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) सरळसेवेची पदे निश्चित करून ती भरण्याची दक्षता घ्यावी. अनुसूचित क्षेत्रातील पदे स्थानिक अनुसूचित जमातीतील उमेदवारांमधून भरताना स्थानिक अनुसूचित क्षेत्रात काम करणारे बिगर अनुसूचित जमातीचे कर्मचारी अथवा बिगर अनुसूचित क्षेत्रात काम करणाऱ्या अनुसूचित जमातीच्या उमेदवारांच्या समायोजनेची प्रक्रिया ही नव्याने निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यापूर्वी पार पाडावी. 

* पुढीलप्रमाणे खाली दिलेली पदे भरण्याच्या संदर्भांत शाशनाने सूचना केल्या आहेत .

  • आरोग्य पर्यवेक्षक
  • आरोग्य सेवक (पुरुष) ४०%
  • आरोग्य सेवक (पुरुष) ५०%
  • आरोग्य सेवक (महिला)
  • औषध निर्माण अधिकारी
  • कंत्राटी ग्रामसेवक
  • कनिष्ठ अभियंता (ग्रा.पा.पु.)
  • कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)
  • कनिष्ठ अभियंता (विद्युत)
  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (ल.पा.)
  • कनिष्ठ आरेखक कनिष्ठ यांत्रिकी कनिष्ठ लेखाधिकारी
  • कनिष्ठ सहाय्यक (लिपीक)
  • कनिष्ठ सहाय्यक लेखा
  • जोडारी
  • तारतंत्री
  • पर्यवेक्षिका
  • पशुधन पर्यवेक्षक
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांत्रिकी
  • रिगमन (दोरखंडवाला)
  • लघुटंकलेखक लघुलेखक (उच्च श्रेणी) लघुलेखक (निम्न श्रेणी) वरिष्ठ सहाय्यक (लिपीक) वरिष्ठ सहाय्यक लेखा
  • विस्तार अधिकारी (कृषि)
  • विस्तार अधिकारी (पंचायत)
  • विस्तार अधिकारी (शिक्षण) (वर्ग३ श्रेणी २) विस्तार अधिकारी (सांख्यिकी)
  • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक

महाराष्ट्र शासनाने जिल्हा परिषदांना केलेल्या सूचना पुढील प्रमाणे  

  •  भरती प्रक्रयेसाठी विचारत घ्यावयाचे वय ,शैक्षणिक अहर्ता व वय विचारात घ्यावयाचा दिनांक . 

  • वृत्तपत्रामध्ये प्रसिध्द करावयाची नमुना जाहिरात व जिल्हा  परिषदेच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करावयाची सविस्तर सूचना . 

  • ऑनलाईन पद्दतीने घेतलेल्या स्पर्धा परीक्षांच्या गुणवत्ता यादी व निवड यादी . 

  • उमेद्वारांची कागतपत्र पडताळणी .

  • अनुसूचित  क्षेत्रातील (पेसा) सरळसेवेची  पदे भिरणेबाबत. 

  •  निवड झालेल्या उमेदवारांना द्यावयाचे नियुक्ती आदेश .  


अधिक माहितीसाठी व नवीन G. R. पाहन्यासाठी येथे क्लीक करा .








टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

महाराष्ट्र-राज्य-अनुसूचित-जाती-जमाती-आयोग-Maharashtra-State-Scheduled-Castes-Tribes-Commission

पनीर कसे बनवावे. पनीर खाण्याचे फायदे. पनीरमधील महत्त्वाचे पोषक घटक.PANEER KASE BANVAVE-PANEER BENIFITS-IMPORTANT-NUTRIENTS-IN-PANEER

मेथीची भाजी /METHICHI BHAJI/METHICHI BHAJI IN MARATHI/METHICHI BHAJI RECIPES