पुरवठा-निरीक्षक-आणि-उच्चस्तरीय-लिपिक-भरती-food-inspector-recruitment-2023.

 पुरवठा निरीक्षक आणि उच्चस्तरीय लिपिक भरती 







                शासन निर्णय वित्त विभाग 31.10.2022 अन्वये पदभरतीवरील निरबंधामध्ये शिथिलता  देऊन ज्या विभागांचा सुधारित आकृतिबंध अंतिम  झालेला आहे अशा विभागातील सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदे 100 टक्के भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. तद्नुषंगाने उच्चस्तर सचिव समीतीच्या मान्यतेने या विभागाच्या शासन निर्णय दिनांक.18.4.2022 अन्वये अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षन विभागाच्या अधीपत्याखालील सर्व कायालयाच्या पदाांचा आढाव्याअंती आकृतीबंध निश्चित करण्यात आला आहे.    

             सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक.21.11.2022 रोजीच्या शासन निर्णयान्वये भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मांडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड सांवगातील सरळसेवेच्या कोट्यातील पदे सरळसेवेने भरताना यापुढे स्पर्धा परिक्षा टी.सी.एस., आय.ओ.एन, आय. बी. पी. एस. या कंपनीमार्फत ऑनलाईन पध्दतीने घेण्यास मान्यता देण्यात आली आहे.  

                 त्यानूसार पुरवठा शाखेतील पुरवठा निरीक्षकांची आणि वित्तीय सल्लागार व उप सचिव यांच्या कार्यालयाच्या अधिपत्याखालील उच्चस्तर लिपिकांची सरळसेवेची रिक्त पदे भरण्याची प्रक्रीया आय.बी.पी.एस. कंपनीमार्फत राबविण्याची तसेच भरती प्रक्रिया राबविण्याकरीता समन्वय अधीकारी यांची नेमनूक करनेबाबतची बाब शासनाच्या विचाराधी होती. 

  काय आहे शासन निर्णय :- 

1.प्रस्तावनेत नमुद केलेली वस्तुस्थिती विचारात घेऊन, सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक.04.05.2022 रोजीच्या शासन निर्णयान्वये दिलेल्या निरदेशानुसार अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षिन विभागाच्या अधिपत्याखालील पुरवठा शाखेतील पुरवठा निरीक्षकाांची आनि वित्तीय सल्लागार व उप सचिव याांच्या कायालयातील उच्चस्तर लिपिकांची सरळसेवेची रिक्त पदे स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून भरण्यात येनार असून, सदर भरती प्रक्रीया राबविण्यासाठी आय.बी.पी.एस. कांपनिची निवड करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. 

  •   केंद्रीय पद्धतीने भरती...

2. विभागीय आयुक्त याांच्या अधीनस्त पुरवठा शाखेतील पुरवठा निरीक्षक हे पद विभागीय संवर्गातील पद आहे. पदभरतीमध्ये एकसुत्रता राहने आवश्यक असल्याने सदर पदाची भरती प्रक्रिया केंद्रीय पध्दतीने करण्यात यावी.   

  • सरळसेवेच्या माध्यमातून ... 

3. तसेच, पुरवठा निरीक्षक आनि उच्चस्तर लिपीकाांची  सरळसेवेची रिक्त पदे स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून भरण्याच्या अनुषंगाने भरती प्रक्रीया राबविण्यासाठी, समन्वय व अनूषंगीक आवश्यक कार्यवाही करण्यासाठी खालील समन्वय अधीकारी याांची नेमनूक करण्यात येत आहे. 


  •  भरती प्रक्रिया राबनविण्यात येना-या पदाचे नाव--- संबंधित समन्वय अधीकारी 

1. पुरवठा निरीक्षक---- उप आयुक्त (पुरवठा), कोकण विभाग, नवी मुंबई. 

2. उच्चस्तर लिपीक ----वित्तीय सल्लागार व उप सचिव.  

  • कोण घेणार परीक्षा... 

4. सदर भरती प्रक्रिया राबनवण्याच्या अनूषंगाने शासनाच्या वतीने आय.बी.पी.एस. कंपनीसोबत सामांजस्य करारनामा (MOU) करण्यासाठी उप आयुक्त (पुरवठा), कोकण विभाग, नवी मुांबई यांना प्राधीकृत करण्यात येत आहे.   


  • परीक्षा फी संबंधी :-

 5.  परीक्षा शुल्काची रक्कम डेबिट कार्ड (RuPay/Visa/Master Card/Maestro ), क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, IMPS, कॅश कार्डस (cash cards) / मोबाइल वॉलेट वापरून भरली जानार आहे. यास्तव सदरची रक्कम या विभागाचे आहरण व सवितरन अधीकारी याांचे चालू खाते क्र. 60355600348, बँक ऑफ महाराष्ट्र, मंत्रालय, मुंबई शाखा यामध्ये जमा करण्यात यावी. 

  • अधिक माहितीसाठी..  

 6. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या सांकेतस्थळावर उपलबद्ध करण्यात आले असून त्याचा सांकेतांक 202305171626560906 असा आहे. हा शासि निर्णय डीजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल याांच्या आदेशानूसार व नावाने.

  • परीक्षेचा अभ्यासक्रम 
  • एकूण रिक्त जागा 
  • वयोमर्यादा 
  • शैक्षणिक अहर्ता
  • ऑनलाईन अर्जाचा दिनांक 
  • परीक्षा फी 

ई .माहिती लवकरच अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षन विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर कळवण्यात येईल .

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा. 


माहिती आवडल्यास नक्की शेअर करा लाईक करा. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

महाराष्ट्र-राज्य-अनुसूचित-जाती-जमाती-आयोग-Maharashtra-State-Scheduled-Castes-Tribes-Commission

पनीर कसे बनवावे. पनीर खाण्याचे फायदे. पनीरमधील महत्त्वाचे पोषक घटक.PANEER KASE BANVAVE-PANEER BENIFITS-IMPORTANT-NUTRIENTS-IN-PANEER

मेथीची भाजी /METHICHI BHAJI/METHICHI BHAJI IN MARATHI/METHICHI BHAJI RECIPES