गुलमोहराविषयी थोडक्यात माहिती ......GULMOHAR-JWALA-ज्वाला -BHADAK-भडक-मोलश्री-ब्लॅकबोर्ड ट्री-मेडलर-बुलेट वुड ट्री


गुलमोहर 





                                मे महिना नुकताच  चालू झालेला होता पावसाळ्यात हिरवागार असणारा गुलमोहर आता पाने गाळायला लागला होता . हिवेगार असणारे रूप आता वृध्दापकाळाने वाटलेल्या झाडासारखा दिसत होते  . पानांचा  पडलेला सडा आता येणारा - जाणारा तुडवून तसाच पुढे जात होता . पण कुणालाही त्याच्या नवजीवनाचा हाच तर उगम आहे याची तीळ मात्र कल्पना नव्हती . त्याच्या जववाळून गेलेली रेल्वेची पटरी तिला मात्र याची कल्पना होती कि इतकेदिवस सावली देणारा गुलालमोहर आता का नाराज झाला असेल. आज तिला पण उन्हाचे चटके सहन करावे लागत होते ,आजपर्यंत तीला उन्हाची कधी जाणीव झाली नव्हती पण आज मे चे ऊन ते तिला जाणवून देत होते . पण तीला काय माहित कि आज तो कीती खुश आहे कारण त्याचा आवडीचा वसंत ऋतू नवजीवन घेऊन आला होता . तो मात्र मनोमन आनंदित होता  आणि पाटरीच्या त्या विचारा वर हसत होता .  

                      

                   गुलमोहर आता कळ्यांनी गच्च भरला होता . हळू हळू त्याच्या कळ्या फुलेझाल्या होत्या हे कोणालाच समजले पन नाही. आता येणारा -जाणारा त्याच्याकडे कुतूहलाने पाहत होता ,कामाची सुरुवात करताना त्याच्या उत्सहाने कामाला लागायाचा. मला मात्र गवळदरा  ,मोहळदरा  ,लाकडदरा  ,डीकदारा ,चोरदरा ,हिवरमाळाच्या खोरीत फुललेला पलास /पळस आठवायचा . तसा  पळस म्हणजे गुलमोर नाही पण लांबून पहिले तर सारखेच वाटतात . दिवसेंदिवस गुलमोहर फुलत आहे . त्याचे फुलने जणू सगळ्यांसाठी एक  प्रेरणाच आहे . सुगंध नसला म्हणून काय झाले त्याचे मनमोहक रूप च सर्व काही आहे .तो एक उष्णकटिबंधीय पानझडी वृक्ष आहे . पानगळ तर होणारच. 
                       सकाळी - सकाळी  रेल्वेच्या वर्कशॉप मध्ये वेल्डिंग शॉप ला जाताना प्रथम त्याचे दर्शन होते आणि मग माझा नित्यक्रम चालू होतो . लांबूनच लालभडक दिसणारा गुलमोहर हसऱ्या चेहऱ्याने माझे स्वागत करतो . लाल भडक दिसतो म्हणून च त्याला ' भडक ' नाव आहे . भर दुपारी तो आगीच्या ज्वाळांसारखा दिसतो म्हणून त्याला 'ज्वाला ' ह्या  पण नावाने ओळखातात .   त्याला बरीच नावे आहेत ,त्याच्या वापरानुसार त्याची अनेक नावे आहेत . 
                      NG शॉपच्या नेरळ -माथेरान नॅरो गेज ची काही कोच त्याच्याकडे बघून स्वतःचे दुःख विसरून जातात . त्याच्या बाजूलाच चिंच ,लिंब ,जांभूळ ,अशी झाडे आहेत पण गुलमोराचं रूपच न्यारे आहे . 
                       गुलमोहराच्या लाकडाचा उपयोग लाकडी फळे , फळझाडांच्या व्यतिरिक्त गुलमोहर, मोलश्री आणि अल्स्टोनिया फुलांच्या झाडांना प्राधान्य दिले जाते. ऍल्स्टोनिया  स्कॉलरिस हे एपोसिनेसी कुटुंबातील एक सदाहरित उष्णकटिबंधीय वृक्ष आहे आणि त्याच्या लाकडाचा वापर ब्लॅकबोर्ड आणि पेन्सिल बनवण्यासाठी केला जातो, म्हणून त्याला ब्लॅकबोर्ड ट्री असेही म्हणतात. हे मूळ भारतीय उपखंडातील आहे. मोलश्रीचे वनस्पति नाव mimusops elengi आहे. याला स्पॅनिश चेरी, मेडलर किंवा बुलेट वुड ट्री असेही म्हणतात.
                       

तिसरी श्रेणी गुलमोहर झाडाची आहे ज्याची आपण येथे चर्चा करत आहोत. गुलमोहरला डेलोनिक्स रेगिया किंवा रॉयल पॉइन्सियाना म्हणतात जे फॅबॅसी कुटुंबातील आहे. हे फर्नसारखी पाने आणि फुलांच्या भडक प्रदर्शनासाठी प्रसिद्ध आहे आणि म्हणूनच याला 'भडक' किंवा 'ज्वाला' वृक्ष असे दुसरे नाव मिळाले आहे. 'डेलोनिक्स' हा दोन ग्रीक शब्दांपासून बनला आहे: 'डेलोस' म्हणजे 'स्पष्ट' आणि 'ओनक्स' म्हणजे पाकळ्यांच्या आकाराचा संकेत म्हणून 'एक पंजा'.
                       केरळमध्ये गुलमोहरला 'कालवरीपू' म्हणतात, म्हणजे कलवरीचे फूल. गावंच फुलांनी भरलेला मात्र शेंदरी रंगाचा प्रत्यय आणून देतो . इतकेच नाही तर त्याला वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळी नवे आहेत .  असो तो मनमोहक आहे म्हणून त्याचीच नाहीतर सर्व वृक्षांची आपण काळजी घ्यायला हवी.तो घराची शोभा वाढवतो .बंगल्याची ,परिसराची , रस्त्याची पण शोभा वाढवतो. तो सर्व सजीवांना उपयोगी ठरतो. 
                       उन्हाळ्यात हा वृक्ष सर्वांचे मन वेधून घेतो म्हणून या विषयी थोडेसे लिखाण.... 
                        
                                               🌴  " झाडे लावा झाडे जगवा "  🌴                    
                                                     

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

महाराष्ट्र-राज्य-अनुसूचित-जाती-जमाती-आयोग-Maharashtra-State-Scheduled-Castes-Tribes-Commission

पनीर कसे बनवावे. पनीर खाण्याचे फायदे. पनीरमधील महत्त्वाचे पोषक घटक.PANEER KASE BANVAVE-PANEER BENIFITS-IMPORTANT-NUTRIENTS-IN-PANEER

मेथीची भाजी /METHICHI BHAJI/METHICHI BHAJI IN MARATHI/METHICHI BHAJI RECIPES