आरोग्य-UNHALA-SUMMER- उष्माघात-उष्माघाताची कारणे-उष्माघाताची लक्षणे-उष्माघातावरउपाय-उष्माघाताघ्यावयाची काळजी
उष्माघात
मित्रांनो मे चा महिना आहे आणि ऊन पण जास्तच पडत आहे .रोज आपण कुठे नकुठं तरी उष्माघाताचा बळी गेला या बातम्या ऐकतो.वरचे वर उन्हाची तीव्रता वाढतच आहे म्हणून आपण उष्माघात टाळण्यासाठी विशेष काळजी घ्यावी.काही न काही कारणानें आपण उन्हात फिरत असतो परंतु आजकाल आपण टिव्ह, फेसबुक, watsup,यावर उष्माघाताचे बळी गेलेल्या बातम्या वाचतो आणि मग धक्काच बसतो,अस का होते याचा आपण कधीच विचार करत नाही.
१.उष्माघाताची कारणे.
२.उष्माघाताची लक्षणे
3.उष्माघातावर उपाय
४.घ्यावयाची काळजी
५.उष्माघाताने मृत्यू का होतो
६.उष्माघात होतो कोणाला
१.उष्माघाताची करणे.
मित्रांनो आपल्या शरीराचे तापमान 37℃ हे स्थिर असते.शरीराचे तापमान हे कष्टाचे काम करताना ,जिम करताना,रंनिग करताना वाढते परंतु;शरीरातून निघणार घाम तापमान नियंत्रित ठेवण्याचे काम करत असतो.घाम आला की आपल्याला तहान लागते त्यामुळे पाणी भरपूर प्यावे लागते.आजकालच्या धावपळीच्या जीवनात आपण आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करतो.आशा परिस्थितीत पाणी भरपुर न पिल्याने घामावाटे पाणी निघून जाते आणि आपल्याला थकवा जाणवतो,कधीकधी चक्कर पण येते.
२.उष्माघाताची लक्षणे
वरवर पाहता उष्माघात हा काही नवीन नाही
थकवा जाणवतो,
चक्कर येते,
बेशुद्ध शुद्धा होतो माणूस.
घशाला कोरड पडते.
कधी कधीकधी तर नाकातूनरक्तयेते
यावर आपण जागरूक असायला हवे.
3.उष्माघातावर उपाय
उष्माघात झाला आहे हे लक्षात आल्यावर लगेच नजीकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करावे ,काही वेळा आपण कुठेतरी दूर कामाच्या ठिकाणी शेतात ,बांधकाम ठिकाण या जागी असतो तेव्हा प्राथमिक उपचार सुरू केला पाहिजे.त्यामध्ये प्रथम त्याला पाणी पिण्यास द्यावे पेशंट जर हाय बीपी,हाय शुगर असेल तर त्याची औषधे उपलब्ध असतील तर ती द्यावीत.आणि शक्य होईल तेव्हडे दवाखाना जवळ करावा.
४.घ्यावयाची काळजी
उष्माघातापासून आपण बचाव करू शकतो.कामाच्या वेळेत आपल्याला बदल करावा लागेल,शेतीची कामे सकाळी 6 ते 10 या वेळेतच पूर्ण करावी आणि संध्याकाळी 4 ते 6-7 पर्यंत करू शकता.
घराबाहेर पडताना किंवा काम करताना शक्यतो ऊन टाळावे परंतू जरी उन्हात गेलात तरी डोक्याला शेला,पागोटे,टोपी,पटका, रुमाल काहीनाकाही नक्कीच बांधावे.शरीरावर जास्तीत जास्त प्रमाणात पांढरा कापडा वापरावा जेणेकरून सूर्यप्रकाश परावर्तित होऊन ऊन कमी लागेल.हाय शुगर,हाय बीपी असणाऱ्यानीं औषधे वेळेवर घ्यावी. मे चा महिना म्हणजे लगीन साराई असते मोठ्या प्रमाणात लग्न मे महिन्यात असतात.लग्न च नाहीतर कोणताही कार्यक्रम आयोजित करताना सकाळी किंवा संध्याकाळी ठेवावा.जेनेकरून ऊन टाळता येईल.
५.उष्माघाताने मृत्यू का होतो?
मानवी शरीराचे तापमान सरासरी 37℃ असते परंतु उन्हामुळे ते वाढत जाऊन 42 -45 होते आणि तेच धोकादायक असते.42 ℃ला रक्ताला वाहन करताना अडथळा निर्माण होतो आणि रक्त गोठण्यास सुरवात होते.रक्तामध्ये असणारी प्रोटिन्स खराब होण्यास सुरवात होते,एकेक अवयवांची कार्यक्षमता कमी होते ,रक्त गोठणे लवकर होते अशी हृदय बंद पडते,मेंदूचा रक्तप्रवाह बँड झाला की अशातच रुग्ण दगवू शकतो.
६.उष्माघात होतो कोणाला
उष्माघात झालेल्या रुग्णांचा सर्वे केला तर त्या ठिकाणी आपल्या जास्त प्रमाणात पाणी न पिणारी ,शुगर,बीपी असणारे ,म्हातारी माणसे,लहान बालके यांचा जास्त समावेश आहे.ज्या लोकांची रोग प्रतिकारशक्ती कमी आहे असे लवकर बळी पडतात.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा