शेतीची मशागत आणि पेरणी !SHETI-MASHAGAT-KUALVANI
मशागतीपूर्वची तयारी शेतीची मशागत करताना प्रथमतः आपल्याला जमिनीमध्ये असणारे काटे कुठे आणि पालापाचोळा यांची योग्य ती विल्हेवाट लावली पाहिजे बांधावर असणाऱ्या काटेरी झुडपे, गवत यापासून स्वच्छ करून घेणे गरजेचे असते.शेतीची तयारी कार्य करत असताना आपण खलील बाबींचा विचार प्रामुख्याने करतो. 1.जमीनीचे सपाटीकरण. त्यानंतर बारीक विचार केला तर जमिनीची असणारी लेवल एकसारखी आहे की नाही यावरून आपण योग्य ती समतोल पातळी करून घ्यावी त्याचबरोबर आपल्याला पाऊस पडल्यानंतर येणाऱ्या पाण्याचा प्रवाह योग्य दिशेने काढून देण्याची गरज असते या सर्व गोष्टीचा विचार करून जमिनीच्या मशागतीच्या तयारीला लागावे लागते. एकंदरीत जमिनीच्या साफसफाई चे काम झाल्यावर आपल्याला मशागतीची गतीची तयारी करावी लागते.जमिनीची मशागत करताना आपल्याला खलील बाबींची काळजी घ्यावि लागते . 2. बांध-बंदिस्त करणे. बऱ्याच ठिकाणी डोंगराळ भाग असतो त्यामुळे जमिनीची असणा...